Thursday, 4 April 2013

माणसाचा स्वभावाच आहे तो...



माणसाचा स्वभावाच आहे तो...

माणसाचा स्वभावाच आहे तो
कुनि कामाला पुढे ढकलतो,
बॉस अप्रेजल पुढे ढकलतो,
तर एखादा गरीब मरणाला पुढे ढकलतो
मरणाला कवटाळणारा क्वचितच जन्माला येतो,
न मागता सगळे देणारा देवत्वाला पोहोचतो.
तरीही मरणाच्या बाजारातली तेजी काही सरत न्हाई,
काही जन मात्र चंदनाच्या लाकडाशिवाय सरणावर चढत न्हाई

असच चालत हल्ली अस म्हणून भागणार न्हाई
दुसर्याच पांघरून आपल्याकड वढून चालणार न्हाई  
न्हायतर एक दिवशी वढलेल्या पांघरुणाखाली गुदमरला जाशील.
पन माणसाचा स्वभावच तो आक्षी म्हणूनशान भागणार न्हाई...


सर्व रसिकांना एक विनंती :- 
( काही जणांना हे दुर्बोध वाटेल त्याबद्दल आधीच क्षमस्व )

आपला उपेक्षित...

Tuesday, 2 April 2013

संभाजी राजे – एक दुर्दैवी योद्धा...




संभाजी राजे – एक दुर्दैवी योद्धा...

          बर्याचदा काही घरात असे होते कि एक मुल हुशार असेल तर त्याचेच जास्ती लाड होतात आणि जरा कमी हुशार मुलाला उपेक्षित केले जाते तसेच काहीसे संभाजी राजेनबद्दल झाले.
छत्रपती शिवाजी या सूर्याच्या प्रकाशामुळे संभाजीराज्यांचा प्रकाश कुणाला दिसलाच नाही, दिसले ते फ़क़्त त्या प्रकाशाला लागलेले ग्रहणच.
मी माझ्या परीने असे का घडले याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि करतोय कारण हा कधी न संपणारा प्रवास आहे.
             लहानपणापासून संभाजी हे चंचल आणि तापट स्वभावाचे होते त्याचप्रमाणे त्यांना स्वतःच्या आईचे (थोर सईबाई) वात्सल्य काहीच मिळाले नाही. आई नाही या कारणाने जिजाऊ या लहानग्यासंभाजीला फार जपत आणि त्याचे फार लाड करत कदाचित याच कारणाने संभाजी थोडे गाफील आणि बेसावध राहिले
                 कारण नंतरकपटी सोयराबाई आणि छत्रपतींच्या दरबारातील काही बाजार बुन्ग्यांनी संभाजी विरुध्द कारस्थाने चालू केलेली होती.लहान वयापासूनच संभाजी राजे हे धाडसी आणि निर्भय होते कारण राजे जेव्हा आग्र्यातुन सुटायचा मनसुबा रचत होते तेव्हा लहान संभाजीराज्यांनी थोडी जरी चूक केली असती तरीही पूर्ण मराठी राज्य पोरके झाले असते. पण त्यानंतरचा काळ शिवाजीराज्यांसाठी फार धामधुमीचा आणि संकटाचा होता कारण राजकारणाच्या पटावर त्यांना चहुबाजूने अडकावण्यात आले होते त्यामुळे त्यांना घरी जे कट-कारस्थान चालू झाले होते ते समजलेच नाही.
               हळू हळू परिस्थिती इतकी बिघडली कि संभाजी राजे व्यसनांच्या आहारी जाऊ लागले कारण शिवाजी राजेंचा मुलगा या नात्याने त्यांच्या वर प्रचंड दडपण असावे आणि ते पेलावण्याची क्षमता असूनही केवळ मानसिक खच्चीकरणामुळे आणि दडपणामुळे संभाजी राजे चुकीच्या मार्गाला गेले. इतके कि पार शत्रूच्या गोटाला जाऊन मिळाले.
त्यांना गादी मिळू नये म्हणून त्यांच्याबद्दल भरपूर अफवाही पसरवल्या गेल्या त्यातील काही अत्यंत हीन स्वरूपाच्या आणि       लाजवणार्या होत्या.( काही अपवाद वगळता त्या धादांत खोट्या होत्या) angery
नंतर शिवाजी राजांनी त्यांना परत स्वराज्यात आणले तो भाग वेगळा पण तोवर खूप उशीर झाला होता संशयाचे धुके गडद होत चालले होते आणि मराठी साम्राज्यावरचा शिवाजी नामक सूर्य अस्ताकडे चालू लागला होता.
               शिवाजी राजाननंतर जरी शंभू छत्रपती झाले तरीही त्यांना ना जनतेने मनापासून साथ दिली ना त्यांच्या सरदारांनी आणि नाही घरून साथ मिळाली. हा माणूस एकहाती मराठेशाही राखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता.पण त्यात त्यांना सपशेल अपयश आले कारण मराठी समाजाला लागलेली फंद फितुरीची आणि बेकीची कीड यांनी त्यांचा घात केला आणि एक अजोड योद्ध, एक कुशल राजकारन्याला धर्मासाठी हालाचे मरण पत्करावे लागले. Sad
सध्या सुद्धा त्यांच्या नावाने समाजात जातीय तेढ वाढवण्याचाच प्रकार एक तथाकतीत संघटना करीत आहे. म्हणजेच अजूनही ह्या शंभूचे भोग पुरे झालेले नाहीत असेच म्हणावेसे वाटत आहे. Sad

समाजात असलेले जातीचे कोंदण...



समाजात असलेले जातीचे कोंदण




             खरे तर आज भारत स्वतंत्र होऊन ६५ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटल्यावरपण आपल्याला या विषयावर चर्चा करण्याची वेळ यावी हे खरे तर आपले दुर्दैव आहे असे मला वाटते, पण खरेच जातीच्या पल्याड व्यवस्था निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो आहोत का ?


महासत्तेच्या गप्पा जेव्हा आपण मारत असतो तेव्हा एकीकडे राजकारणी लोक (राजकारणीच कशाला आपण सुद्धा) ब्राम्हण, मराठा, इ वर आपआपले लौबिंग करत असतात किती हि विसंगती? कि आपणच आपल्या डोळ्यावर लावलेली झापड असते हि ?
                    जातीवर आधारित आरक्षणामुळे तर थोड्या दिवसाने अर्थव्यवस्थेला आणि देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण व्हायची शक्यता मला दिसत आहे (का कोण जाणे भारताचा युरोप होईल असे मला उगाच वाटत असते) {विभाजनाच्या बाबात} कारण आज मराठे आरक्षण मागत आहेत उदयाला ब्राम्हण मागतील मग दर्जावर आधारित निवडीच्या ऐवजी हा त्या जातीचा म्हणून निवड होणार आणि पुढे तो माणूस जे काम करणार आहे त्याच्या दर्जाबाबत न बोललेलेच बरे.
                     अजुन एक महत्वाचे निरीक्षण असे कि आज एका विशिष्ठ वर्गाला सातत्त्याने लक्ष्य करण्यात येत आहे (त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या चुकानसाठी) अत्यंत हीन पातळीवर त्या वर्गाची अब्रू काढण्यात येत आहे आणि ते हि इतिहासात झालेल्या चुका उगाळून. आणि हे इतक्या पद्धतशीरपणे चालू आहे कि यातून रामदास स्वामी, वीर सावरक, पु ल देशपांडे, लो.टिळक, आचार्य अत्रे इ. थोर माणसे सुद्धा सुटली नाहीत अर्थात त्या तथाकथित वर्गाकडूनही या आगीत काही प्रमाणात तेल ओतले जात आहे हेही तितकेच खरे आहे आणि हे सर्व सत्तेसाठी आणि राजकारणासाठी चालू आहे हेही सांगणे न लागे.
                       कालच मी वाचले कि श्री प्रकाश आंबेडकर यांनी मागणी केली आहे कि शाळेत नाव घालताना जातीचा कौलम नसावा किती मस्त आहे न हा उपाय कारण नकळत्या वयात आपणच आपल्या मुलांना तू ब्राम्हण, तो बौध्ह हा मराठा बरका असे सांगतो आणि विभाजनाचे, दुराव्याचे बीज रोवत असतो. मग जर सुरवातीलाच जातीची भिंत नसेल तर ती पुढे पण आडवी येणार नाही पण त्यासाठी मात्र खूप प्रयत्न करावे लागतील कारण सत्तेचे आणि धर्माचे दलाल असे सहज करू देतील असे नाही.
                     हरियाना, राजस्थान इ राज्यात तर जातीबाहेर लग्न केलेल्या तरुण-तरुणींची अमानुष पध्दतीने मुस्कटदाबी केली जाते. जातीचा इतका जबरदस्त पगडा तिथे जाणवतो कि कायदा तिथे अस्तित्वात आहे कि नाही असेच वाटू लागते.
या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे जात पात न मानता माणसाच्या गुणवत्तेवर त्या माणसाची पारख करायला शिकले पाहिजे मग भले तो कुठल्या का जातीचा असो.
आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांना आधार द्यायचे काम करता आले तर ते सुद्धा एक मोठे यश म्हणता येईल आपल्याला.
अवांतर :- हा धागा काढण्याचा उद्देश जुन्या गोष्टी उगाळण्याचा अथवा एकमेकांना दुषणे देण्यासाठी काढलेला नाही तर सध्या असलेल्या जातीपातीला हटवण्यासाठी काय करता येईल या विषयी काढलेला आहे तरीही कृपया कुणाही जातीबद्दल अथवा व्यक्ती बद्दल इथे वादग्रस्त विधाने करू नयेत जेणेकरून आपल्याला आपसात होणारे वाद टाळून विषयाला न्याय देता येऊ शकेल.
उपेक्षित***