Wednesday, 14 September 2016

भास...आभास.... कि अमानवीय !!! भाग – २

http://upekshit.blogspot.in/2013_11_01_archive.html

भास...आभास.... कि अमानवीय !!!
भाग - 2

आज बरयाच दिवसाने काहीतरी सुचत आहे, कथेला उशीर होत आहे हे मान्य आणि त्याबद्दल दिलगीरी सुद्धा व्यक्त करतो पण उगाच काहीतरी ओढून ताणून लिहायचे म्हणून लिहायचे आणि तुमची फसवणूक करायची याला काही अर्थ नाही, असो...


संध्याकाळी लवकर म्हणजे जवळ जवळ ६ वाजता तात्या आणि त्यांच्या पत्नी राधा सर्व स्वयंपाक आटोपून घाईने आमचा निरोप घेऊन गेले सुद्धा, इतकावेळ त्यांच्यामुळे आम्ही दोघेही जरा निवांत होतो पण ते दोघे गेल्यावर मात्र आमची थोडी टरकली पण मनावर आलेले भीतीचे सावट घालवावे तर लागणार होते आणि त्यामुळे आम्ही बीचवर भटकायला जे बाहेर पडलो ते साधारण ९ वाजता परतलो फिरण्याने भूकही लागली होती त्यामुळे फ्रेश होऊन लगेच जेवण करायला गेलो शलाकाला चेंज म्हणून तिला आज मी सर्व करणार होतो त्यामुळे सर्व करायला भांड्याचे झाकण उघडले आणि अक्षरशः धक्का बसला मला...


आता पुढे ...

डोळ्यासमोर जे दिसले ते बघून चक्कर यायची बाकी होती, मला यायला वेळ लागला म्हणून शलाकापण आत आली आणि तिच्या किंकाळीने तेथील भयाण शांतता भंग पावली कारण आतली सर्व भांडी अगदी रिकामी आणि घासूनपुसून स्वच्छ करून ठेवली होती म्हणजे तात्या आणि त्यांच्या पत्नीने काही बनवलेच नव्हते ? पण असे कसे होईल ? कारण दुपारपासून तात्या आणि त्यांची मंडळी यांची चाललेली लगबग आम्ही बघत होतो, आलेले विचार दूर सारून मी शलाकाकडे धावलो आणि तिला आधी बाहेर नेऊन तिला धीर देऊ लागलो (आणि स्वतःला सुद्धा), झालेला प्रकार इतका धक्कादायक होता कि जेवायची वासनाच गेली होती आमची पण आता जर तसेच बसून राहिलो तर डोके नक्कीच भंजाळून गेले असते त्यामुळेo मी शलाला बाहेर डिनर साठी यायला रेडी केले.
दाराला कुलूप लावून आम्ही आंजर्ले रोडवर अप्पा काणेंच्या घरगुती खानावळीत जेवायला आलो हि खानावळ आम्हाला वर्तकांनी सांगून ठेवली होती बुकिंग करायच्या वेळी त्यामुळे मनोमन वर्तकांचे आभार मानत जेवायला सुरवात केली. साधे पण रुचकर जेवण होते पोळी, कोकणस्थी पद्धतीची गोडसर आमटी, मस्त कवळ्या फणसाची भाजी आणि गरमागरम भात तेही केळीच्या पानावर त्यात तोंडी लावायला ताज्या आंब्याचे लोणचे नाही नाही म्हणता भरपेट जेवण झाले त्यात अप्पांनी आणि त्यांच्या घरच्यांनी अगदी आग्रह करकरून जेऊ घातले अगदी घरच्यासारखे त्यामुळे मगाचा तणाव कुठल्याकुठे पळून गेला, नाही म्हणायला जेव्हा अप्पांना आम्ही वर्तकांच्यात उतरलो आहे हे सांगितले तेव्हा थोडा वेळ त्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता आणि नाराजी झळकून गेली पण काही क्षणच नंतर परत सगळे निवांतपणे बोलू लागले.
पण शलाका मात्र अजून तो धक्का पचवू शकत नव्हती कदाचित इथून थोड्यावेळाने परत तिकडे जायचा ताण तिला सहन होत नसावा.

अप्पा काणे साधारण साठीला आलेले गृहस्थ, व्यासंगी माणूस खासकरून अध्यात्म या विषयावर बोलताना ते विशेष खुलुन आले होते. अप्पा रामदासांचे सच्चे भक्त होते. त्यामुळे खूप दिवसांनी जेवायच्या आधी त्यांच्या खड्या आवाजातील मनाचे श्लोक कान आणि आत्मासुद्धा तृप्त करून गेले.

अप्पांच्या चाणाक्ष नजरेने शलाकाची अस्वस्थता बरोबर हेरली. जेवण झाल्यावर त्यांनी खुणेनेच चल शतपावली करायला म्हणून बाहेर नेले फिरता फिरता अप्पांनी मूळ विषयालाच हात घातला. मी सुद्धा त्यांना थोड्यावेळापूर्वी घडलेला प्रकार आहे तसा सांगून टाकला. त्यानंतर अप्पा खूपच गंभीर झाले. अप्पांना नक्कीच काहीतरी माहित असावे त्या घराबद्दल जे त्यांना मला सांगता येत नसावे अथवा जाणीवपूर्वक ते मला त्यापासून दूर ठेवत असावे. कारण मी खोदुन खोदुन विचारून सुद्धा ते फ़क़्त इतकेच बोलले ‘ माणसाच्या आणि विज्ञानाच्या मर्यादा जिथे संपतात तिथे अध्यात्माची आणि नकारात्मक गोष्टींची सुरवात होते’.
      गोष्ट काहीतरी गंभीर असावी असे आता मला वाटू लागले होते कारण अप्पा सारखे मला आत्ताच तिकडून आमच्या इथे शिफ्ट व्हा म्हणत होते, पण मी सुद्धा इरेला पेटलो होतो मी अप्पांना स्पष्टपणे सांगितले कि जोवर मला तुम्ही काही सांगत नाही तोवर मी इथे येणार नाही अर्थात अप्पांचा आदर ठेवूनच मला हे सांगावे लागले. मी ऐकत नाही हे बघून शेवटी अप्पा मला सगळे सांगायला तयार झाले पण रात्र बरीच झाल्यामुळे आधी मी त्यांच्या घरी शिफ्ट व्हावे असा प्रस्ताव त्यांनी मांडला आणि तो मी लगेच मान्य करून टाकला.
मी आणि शलाका आमच्या बॅग्स आणायला निघालो, खरे तर मी एकटे जावे असे अप्पांना वाटत होते पण शलाका मला एकट्याने सोडायला तयार नव्हती. गाडीत बसायच्या आधी अप्पा हळूच माझ्या जवळ आले आणि तुझा विश्वास असो नसो माझ्या समाधानासाठी हे ठेव असे म्हणून त्यांनी केळशीच्या गणपतीचा अंगारा माझ्या हातात बळजबरीनेच दिला आणि शलाकाला जपण्याची सक्त ताकीद दिली.
तिथून मी जरा घाईनेच गाडी काढली आणि तसे करताना हातातील ती अंगारयाची पुडी कधी चुकून हातातून बाहेर पडली ते समजलेच नाही.
गाडीत का कुणास ठाऊक मन थोडे विचलित होऊ लागले होते अप्पांचे म्हणणे टाळून मी काही चूक तर नाही ना करत आहे ? या तंद्रीतच परत वर्तक निवास मध्ये कधी आलो ते समजलेच नाही समोर अंधारात ते घर बघून नकळत अंगावर काटा आला, माझी हि अवस्था तर बिचारी शलाकाची काय अवस्था असेल असे म्हणून मी शेजारी पहिले मात्र आता किंचाळायची पाळी माझी होती कारण क्षणापुर्वी माझ्या शेजारच्या सीट वर असलेली शलाका आता तिथे नव्हती....  

शलाकाच्या काळजीने मी तसाच घराकडे धावलो तर हि दार उघडून माझीच वाट पाहत होती जणू, शलाका आत्ता जरा वेगळीच वाटत होती मला, म्हणजे नेहमीची साधी, नाकासमोर चालणारी ‘ती’ आज ..आज थोडी खोडकर वाटत होती कसलीतरी उत्कटता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तिच्या नजरेत एक आव्हान दिसत होते, समर्पणाची आतुरता दिसत होती. एक क्षण मला काळजीच वाटली पण नंतर मी विचार केला कि कदाचित खूप दिवसाने आम्हाला इतका निवांतपणा मिळालाय म्हणून ती जरा खुलून आली असेल.

पण... कधी कधी माणसाच्या आयुष्यात या ‘पण’ ला खूप महत्व असते कारण या गडबडीत मी गाडीच्या मागच्या सीट वर नजर टाकली असती तर कदाचित...

---------------------------
आपला 

उपेक्षित


Wednesday, 25 May 2016

मनोगत

                सध्या बराच उकाडा आहे सगळीकडे त्यामुळे सगळीकडे कुलर/ACएसी नाहीतर निदान फॅन ची तरी प्रचंड मागणी आहे. थोडा वेळ जरी वीज गेली तरी आपला जीव कासावीस होतो.

               परवा रात्री दिवसभर दमून मस्त झोप लागली होती पण नेमकी पहाटे २/२.३० ला वीज गेली आणि घामाच्या धारांनी जीव पार कासावीस झाला कुठे पेपर ने वारे घे कुठे पाणीच मार चेहऱ्यावर असे उद्योग चालू होते. अचानक पेपरने वारे घेता घेता मन भूतकाळात गेले
              तेव्हा मी साधारण ७/८ वीत असेल आम्ही कर्वेनगरला चाळीत राहायला होतो. काही कारणास्तव चाळीचे वीजेचे कनेक्शन तोडले होते आमच्या. साधारण २ वर्ष पूर्ण वीज नाही आणि १ वर्ष फ़क़्त रात्रीची वीज अशी परिस्थिती होती त्यात डोक्यावर पत्र्याचे छत. पण आत्ता १ तास वीज गेल्यावर जसा जीव कासावीस झाला होता तसा त्या ३ वर्षात कधीही झालेला आठवत नाही काय बरे कारण असेल ?

             खूप विचार केला तेव्हा समजले परिस्थिती येस तीच आपल्याला बळ देत असते अशा दिवसात. आणि उलट तेच दिवस माझ्या आयुष्यात मी जास्ती आनंदाने घालवले असतील असे मला आज वाटते कारण रोज रात्री कँडल लाईट डिनर चे भाग्य फार थोड्या माणसांना लाभते आयुष्यात, चाळीतील मुला-मुलींना रात्री ओट्यावर जमा करून कंदिलाच्या प्रकाशात त्यांना भुताच्या गोष्टी सांगण्याची सवय पण त्याच २/३ वर्षातली.

            घरात वीज नाही त्यामुळे शनिवारी सकाळी शाळेतून मिळेल ती बस पकडून धावत पळत घरी येऊन शक्तिमान बघायला जवळच्या मामाकडे जायचे हे पण एक ठरलेले असायचे खर तर आत्ता या गोष्टीचे हसायला येते पण तेव्हाची ती धडपड खूप मनापासून केलेली असायची साला.

           याच अंधारलेल्या दिवसांनी खरे आपले कोण आहे हे सुद्धा नकळत समजत गेले त्या वयात. आधी उन्हाळ्यात आवर्जून येणारी नातेवाईक मंडळी त्या २/३ वर्षात चक्क गायाबली होती १/२ जणांनी तर तोंडावर सांगितले होते कि तुमच्याकडे वीज नाही आणि टीवी व फॅनशिवाय आम्हाला काही जमत नाही. असो असतो एकेकाचा स्वभाव.

       मात्र कर्वेनगरच्या चाळीत काढलेले ते अतीव आनंदाचे आणि बेफिकिरीचे दिवस आठवून आजही मन हळहळायला लागते.

       वरच्या सगळ्या मनोगतातील तात्पर्य काय तर माणसाने नेहमी परिस्थितीशी हातमिळवणी केली पाहिजे बास...

जाता जाता ...
         हल्ली वीज गेली कि माझा ७ वर्षाचा मुलगा बाबा घरात आता इनव्हटेर घ्या म्हणून मागे लागतो काळाचा महिमा बाकी काही नाही ....

तळटीप :- माझ्या छोट्या आयुष्यातील थोड्याफार संघर्षाची वाटचाल मांडायची इच्छा आहे इथे बघू कसे जमतेय ते...

आपला उपेक्षित...

Monday, 7 July 2014

जगण म्हणजे
जगण म्हणजे रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली मरण असत
जगण म्हणजे
सुखाचा घास मिळवायला दुखा:च रहाटगाड ओढाव लागत
जगण म्हणजे
स्वतः मध्ये वणवा पेटवून त्याच्या असह्य वेदनेमध्ये जळायचं असत
जगण म्हणजे
निव्वळ अंधार मिणमिणत्या अधुरया प्रकाशात सुखाची वाट शोधण असत
जगण म्हणजे
तप्त, भेगाळल्या मरुस्थळावर बेफामपणे, बेफिकीरपणे कोसळणारा पाउस असतो.
जगण म्हणजे
जणू नदीच जिला किनारयाचे बंधन असूनही मुक्तपणे खळाळणारी,
खाचखळग्यातुन वाहत जाऊन शेवटी सुखाच्या सागराला मिळणारी.

जगण म्हणजे
नक्की हेच आहे सगळे ? मला वाटते कि जगणे म्हणजे एका निरागस

बाळाच्या हास्यासारखे असते जे स्वतः सोबत दुसरयालाहि आनंद देत राहते.     

Wednesday, 20 November 2013

भास...आभास.... कि अमानवीय !!!
भाग - १ 

खरे तर हा विषय थोडा ट्रिकी आहे कारण या विषयाव तीन गट पडतात एक जो अशा गोष्टींवर विश्वास आहे असा दुसरा ज्यांचा अशा गोष्टींवर विश्वास नाही ते आणि तिसरा गट तळ्यात मळ्यात असतो या लोकांना काळातच नसते कि नक्की आपण कुठे उभे आहोत असे.

हा विषय इथे मांडायचे कारण हेच आहे कि गेले काही दिवस माझा या गोष्टींवरच विश्वास दृढ होईल अशा काही घटना माझ्या आयुष्यात घडत आहेत. सर्वात आधी हे स्पष्ट करू इच्छितो कि सध्यातरी माझा सुष्ट-दुष्ट अथवा प्लस-मायनस उर्जा या जगात असते या गोष्टीवर विश्वास आहे. जसे कि जगात जिथे प्लस उर्जा आहे तिथे मायनस उर्जेला नाकारायचे काही करणाच नाहीये (असे आपले मला वाटते) कारण जगात बरयाच गोष्टी अशा आहेत कि ज्यांची उत्तरे ना विज्ञान देऊ शकले आहे आजवर ना हि कुणी त्याचे सुसंगत असे स्पष्टीकरण देऊ शकले आहे.

जगात सुष्ट आणि दुष्ट यामध्ये पूर्वीपासून संघर्ष चालू आहे, मला असे वाटते कि या दोहोंमधील जी रेषा आहे ती काहीशी पुसट आहे म्हणजे असे कि बऱ्याचदा असे होते कि काही विचित्र अशा संवेदना आपल्याला जाणवतात पण काही वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष्य करतो अथवा आपण त्याला भास समजतो काही जण तर असे असतात कि इतर लोक काय म्हणतील अथवा आपले हसे होईल म्हणून अशा गोष्टी इतरांना सांगायचे टाळतात. त्याउलट रात्री बर्याचदा काळोखामुळे सावल्यांच्या खेळाला आपण वेगळेच अमानवीय असे काहीतरी समजून बसतो.
आत्म्याचा प्रवास कुणालाच उलगडून सांगता आला नाहीये, माणसाचे मृत्युनंतरचे जीवन अथवा आपण असे म्हणू कि त्याचे मृत्युनंतर नक्की काय होते हेही कुणाला सांगता आलेले नाहीये, मग बरेच जण आपल्या कल्पनेचे वारू सैल सोडतात आणि बऱ्याचदा अशा गंभीर विषयाचा विचका होतो.

मी अशा काही ठिकाणी फिरलेलो आहे कि जिथे टळटळीत दुपारीसुद्धा हात पाय थंड पडतात. अशा ठिकाणी तुम्ही रात्रीचे जावा नाहीतर दुपारचे काही फरक नाही पडत पण पूर्वापारपासून आपण अंधाराचा आणि अमानवीय गोष्टींचा ओढून ताणून संबंध लावायला पाहत असतो कारण सरळ आहे अंधारात कुणी काय पाहिले हे कोणी विचारायला जात नाही मग त्याची शहानिशा करणे तर दूरची बात.

आजही काही जागा अशा आहेत कि जिथे गेले कि माणसाला अस्वस्थ वाटायला लागते, कधी एकदा इथून बाहेर पडतोय असे होते, नाहीतर कुणीतरी आपल्यावर सतत नजर ठेवून आहे असाही फील येतो अशा ठिकाणी.
खरे तर तुम्ही सगळे विचार करत असाल कि हा काय डोक्यावर पडला आहे का नक्की काय म्हणायचे आहे याला ? खरे तर मला जे म्हणायचे आहे ते म्हटले तर साधे सरळ आहे आणि म्हटले तर थोडे विचित्र कारण मला माझ्या आयुष्यात घडलेल्या अशाच विचित्र गोष्टींचा संदर्भ द्यायचा आहे इथे आणि ती गोष्ट तुम्हाला खरी वाटावी, पटावी म्हणून हे सारे अवांतर लिहिले गेले आहे.

बाकी तुमचे काय मत आहे ते हि जाणून घ्यायला आवडेल मला कारण जसजशी माझी गोष्ट पुढे जाईल तसतसे तुम्हाला आणि मला सुद्धा काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.

माझे म्हणणे इतकेच आहे कि मी जसा माझा सत्यानुभव तुम्हाला सांगणार आहे त्याच प्रकारे तुमच्याकडून पण मला ते ऐकायचे आहेत, मात्र अट एकच आहे माझी हे अनुभव प्रामाणिक असावेत, त्यात अतिरंजितपणा नसावा हीच नम्र विनंती आहे, तसेच कुण्या लांबच्या मित्राचे अनुभव इथे देऊ नका, तुम्हाला स्वतः ला आलेले अथवा जवळच्या व्यक्तीला आलेले अनुभव टाकले तर जास्ती चांगले.

असो यावरच्या पुढील भागात माझे काही अनुभव मी तुमच्याशी शेयर करणार आहे ते अनुभव म्हणजे एका विचित्र घटनांची साखळी आहे जिच्या काही कड्या कुठे जोडल्या आहेत ते ना मला माहित आहे ना बाकी कुणाला, तसेच या सर्व घटना मती गुंग करून सोडणाऱ्या आहेत. सरधोपट गूढ कथांसारखा याचा शेवट नाहीये रादर या घटनांना शेवटच नाहीये सध्यातरी कारण अजून याचा शेवट बाकी आहे याचे स्पष्ट संकेत मला मिळत आहेत. त्या कड्या शोधायचा माझा प्रयत्न मात्र मी सोडणार नाही आणि त्या जुळणाऱ्या कड्या तुमच्यासमोर ठेवायचे काम सुद्धा मी सोडणार नाही.

माणसाच्या जाणीवा आणि नेणीवा खूप विचित्र असतात अस नाही वाटत तुम्हाला कधी ? म्हणजे अस बघा कि माणसाला एखाद्या गोष्टीची जाणीव झाली पण ती त्याने कुणाजवळ व्यक्तच नाही केली तर.. तर काय होईल?

खरे तर त्यादिवशी मला सुद्धा असच वाटत होत.....
---------------------------------------------------------------

त्यादिवशी मस्त सुट्टीचा मूड होता आमचा आणि कोकणात सुट्टी म्हणजे मग काही विचारायलाच नको त्यात थोडा दूरचा पण अत्यंत शांत आणि स्वच्छ असा केळशीचा किनारा म्हणजे तर काय आमच्या सारख्या माणूसघाण्या (पुणेकर) लोकांसाठी नंदनवनच जणू.

शनिवारी सकाळी लवकर नाष्टा उरकून आम्ही ताम्हिणीमार्गे केळशीकडे निघालो होतो खूप दिवसांनी असा मोकळा वेळ मिळत होता मला आणि शलाकाला त्यामुळे सकाळी निघाल्यापासून शलाका मला अक्षरशः चिकटून होती आणि तिला खुश पाहून मी तर ‘सांतवे आसमान पे था’. वाटेत कुठेही जास्ती वेळ ण घालवता आम्ही दुपारी २ वाजता केळशीला येऊन पोहोचलो होतो. केळशीला आम्ही राहण्यासाठी वर्तकांचे घर बुक केले होते कारण ते अगदी समुद्रकिनारी तर होतेच पण शिवाय गावापासून थोडे दूर देखील होते त्यामुळे आम्हाला पूर्ण प्रायव्हसी देखील मिळणार होती आणि जी कि आम्हाला खूप मोलाची होती.

दुपारी वर्तकांच्या घर-कम-कॉटेज वर पोहोचल्यानंतर सर्वात आधी तिथल्या केअरटेकर काका ज्यांना सगळे तात्या म्हणून बोलवत त्यांना सांगून कोकणी जेवणावर यथेच्च ताव मारला, गेल्यापासून राहून राहून एक गोष्ट जरा खटकत होती ती म्हणजे तात्या थोडे नाराज दिसत होते म्हणजे त्यांच्या पाहुणचारात काही कसर नव्हती जेवण सुद्धा उत्कृष्ट होते पण तात्या जास्ती काही बोलतही नव्हते आणि सतत दडपण असल्यासारखे दिसत होते, पहिलाच दिवस म्हणून आम्ही काही जास्ती लक्ष दिले नाही पण जेव्हा तात्यांनी आम्हाला परत कधी जाणार, किती दिवस राहणार असे विचारले तेव्हा मी त्यांना थोड्या रागातच समाज दिली कि ते आमचे आम्ही बघू म्हणून तात्या थोडे वरमले आणि आपल्या कामाला निघून गेले.

       कोकणच्या बाबत मी नेहमी एक गोष्ट नोट केली आहे कोकण दिवसभर अगदी द्रिष्ट लागण्यासारखे दिसते पण जसजसा अंधार पसरू लागतो तसतसे थोडे भकास आणि गूढ वाटायला लागते हा गूढपणा कधीतरी छान वाटतो पण नेहमी नेहमी नको रे बाबा अस होऊन जात.

तात्यांचे घर आमच्या कॉटेज पासून साधारण २ किलोमीटर्स होते त्यामुळे संध्याकाळी तात्या आणि त्यांची पत्नी जेव्हा आम्हाला रात्रीच्या जेवणासाठी काय करू म्हणून घाई करू लागले तेव्हा मात्र मी त्यांना बजावले आणि मालकांना तक्रार करायची धमकी सुद्धा दिली त्यामुळे दोघे गप्प बसले असले तरीही आतून खूपच अस्वस्थ वाटत होते.

पहिल्याच दिवशी घराचा शांतपणा जरासा अंगावर येऊ लागला होता त्यामुळे माझा आणि शलाकाचा नाही म्हंटले तरीही थोडा मूड ऑफ झाला होता म्हणून मग आम्ही बाहेर पडवीत असलेल्या भल्यामोठ्या झोपल्यावर उगाच आपले पत्ते खेळ कुठे मोबाईलवर गेम खेळ असले उद्योग करत बसलो होतो पण नाही म्हंटले तरीही त्या गूढ आणि शांत वातावरणाचा आमच्यावर एकप्रकारे अंमल चढत होता.

             संध्याकाळी लवकर म्हणजे जवळ जवळ ६ वाजता तात्या आणि त्यांच्या पत्नी राधा सर्व स्वयंपाक आटोपून घाईने आमचा निरोप घेऊन गेले सुद्धा, इतकावेळ त्यांच्यामुळे आम्ही दोघेही जरा निवांत होतो पण ते दोघे गेल्यावर मात्र आमची थोडी टरकली पण मनावर आलेले भीतीचे सावट घालवावे तर लागणार होते आणि त्यामुळे आम्ही बीचवर भटकाय जे बाहेर पडलो ते साधारण ९ वाजता परतलो फिरण्याने भूकही लागली होती त्यामुळे फ्रेश होऊन लगेच जेवण करायला गेलो शलाकाला चेंज म्हणून तिला आज मी सर्व करणार होतो त्यामुळे सर्व करायला भांड्याचे झाकण उघडले आणि अक्षरशः धक्का बसला मला... 

---------------------------
आपला 


Saturday, 24 August 2013

कधीतरी उगाचच...

कधीतरी उगाचच वाटते कि आपण एकटे आहोत
मग उगाचच दहावेळा गप्प बसलेला फोन काढून परत ठेवण्याचा कार्यक्रम होतो.

मग खूप जवळचा नसलेल्या मित्राला नाहीतर मैत्रिणीला फोन केला जातो
संदेशाची देवाण घेवाण होते ती पण उगाचच.

मग मी उगाचच उठून समोरच्या बाल्कनीत जातो.
रोज रोज दिसणारा एखादा सुंदर चेहरा नेमका त्यावेळी तिथे डोकावतो.
ते हि उगाचच.....

पण साला मग आज ती गम्मत का येत नाहीये ?
रोज जाणवणारी अधीरता आज उगाचच रुसून का बरे बसली आहे ?

मग परत मी घरात जाऊन बसतोत्याच जुन्या रिमोटवर
नेहमीसारखा अत्याचार करून शेवटी मुकेशच्या गाण्यापाशी रेंगाळतो ते हि उगाचच.

मग नकळत त्या मुकेशच्या आवाजातील दर्द जुन्या आठवणी जागवतो,
मग धावत जाऊन मी तो दर्द बंद करायचा प्रयत्न करतो .

खूप कंटाळा आलेला असतोतसाच उठतो हि झोपलेली असते तिथे जाऊन बसतो,
नकळत तिचा हात माझ्या हातात येतो आणि अलगद मी त्यावर ओठ टेकवतो 
 उगाचच...  उगाचच...  उगाचच...  
==============================
आपला उपेक्षित...
==============================

Monday, 19 August 2013

खून..... क्या है ये खून ?

खून..... क्या है ये खून ?


आज पेहली बार ये एहसास हुआ
कि अपना खून खुद से अलग हो तो क्या तकलीफ होती है

खून..... क्या है ये खून ?
वो जो शरीर मै बेहता है ?
या वो जो रीश्तोंके मुखौटे लेकर अपने आसपास रेहता है ?
वैसे खून का असली रंग क्या होता है ?
क्या होती है उसकी नियत?
क्या होते है उसके आदर्श?

गंदी नाली में बेहनेवाला खून क्या खून नही होता?
या वो होता है सिर्फ और सिर्फ गटर का पानी, जिसे चाहे कितना भी साफ करने कि कौशिश करो मगर वो साफ करने वालेके हि गिरेबान को खराब करता है.

लेकीन फिर अमिरोंकि बस्ती में भी कहां साफ खून कि गारंटी है भई?
असंवेदनशीलता के गिलावे पे खाडी वो एक खोकली दिवार होती है.
जो ना कभी वास्तविकता पेहचानती है और न किसीकी सच्ची भूक.
पुराने, झुठे और खोकले आदर्शोनकी बडी दिवारे भी रेहती है यहां पर
जो कोई गरीब जिंदगी भर पार करने कि कौशिश करते करते अनंत काल कि यात्रा पार कब निकल जाता है किसीको पता भी नही चलता और न किसीको फर्क पडता है.   

उपेक्षित...

Thursday, 4 April 2013

माणसाचा स्वभावाच आहे तो...



माणसाचा स्वभावाच आहे तो...

माणसाचा स्वभावाच आहे तो
कुनि कामाला पुढे ढकलतो,
बॉस अप्रेजल पुढे ढकलतो,
तर एखादा गरीब मरणाला पुढे ढकलतो
मरणाला कवटाळणारा क्वचितच जन्माला येतो,
न मागता सगळे देणारा देवत्वाला पोहोचतो.
तरीही मरणाच्या बाजारातली तेजी काही सरत न्हाई,
काही जन मात्र चंदनाच्या लाकडाशिवाय सरणावर चढत न्हाई

असच चालत हल्ली अस म्हणून भागणार न्हाई
दुसर्याच पांघरून आपल्याकड वढून चालणार न्हाई  
न्हायतर एक दिवशी वढलेल्या पांघरुणाखाली गुदमरला जाशील.
पन माणसाचा स्वभावच तो आक्षी म्हणूनशान भागणार न्हाई...


सर्व रसिकांना एक विनंती :- 
( काही जणांना हे दुर्बोध वाटेल त्याबद्दल आधीच क्षमस्व )

आपला उपेक्षित...