संभाजी राजे – एक दुर्दैवी योद्धा...
बर्याचदा काही घरात असे होते कि एक मुल हुशार असेल तर त्याचेच जास्ती लाड होतात आणि जरा कमी हुशार मुलाला उपेक्षित केले जाते तसेच काहीसे संभाजी राजेनबद्दल झाले.
छत्रपती शिवाजी या सूर्याच्या प्रकाशामुळे संभाजीराज्यांचा प्रकाश कुणाला दिसलाच नाही, दिसले ते फ़क़्त त्या प्रकाशाला लागलेले ग्रहणच.
मी माझ्या परीने असे का घडले याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि करतोय कारण हा कधी न संपणारा प्रवास आहे.
लहानपणापासून संभाजी हे चंचल आणि तापट स्वभावाचे होते त्याचप्रमाणे त्यांना स्वतःच्या आईचे (थोर सईबाई) वात्सल्य काहीच मिळाले नाही. आई नाही या कारणाने जिजाऊ या लहानग्यासंभाजीला फार जपत आणि त्याचे फार लाड करत कदाचित याच कारणाने संभाजी थोडे गाफील आणि बेसावध राहिले
कारण नंतरकपटी सोयराबाई आणि छत्रपतींच्या दरबारातील काही बाजार बुन्ग्यांनी संभाजी विरुध्द कारस्थाने चालू केलेली होती.लहान वयापासूनच संभाजी राजे हे धाडसी आणि निर्भय होते कारण राजे जेव्हा आग्र्यातुन सुटायचा मनसुबा रचत होते तेव्हा लहान संभाजीराज्यांनी थोडी जरी चूक केली असती तरीही पूर्ण मराठी राज्य पोरके झाले असते. पण त्यानंतरचा काळ शिवाजीराज्यांसाठी फार धामधुमीचा आणि संकटाचा होता कारण राजकारणाच्या पटावर त्यांना चहुबाजूने अडकावण्यात आले होते त्यामुळे त्यांना घरी जे कट-कारस्थान चालू झाले होते ते समजलेच नाही.
हळू हळू परिस्थिती इतकी बिघडली कि संभाजी राजे व्यसनांच्या आहारी जाऊ लागले कारण शिवाजी राजेंचा मुलगा या नात्याने त्यांच्या वर प्रचंड दडपण असावे आणि ते पेलावण्याची क्षमता असूनही केवळ मानसिक खच्चीकरणामुळे आणि दडपणामुळे संभाजी राजे चुकीच्या मार्गाला गेले. इतके कि पार शत्रूच्या गोटाला जाऊन मिळाले.
त्यांना गादी मिळू नये म्हणून त्यांच्याबद्दल भरपूर अफवाही पसरवल्या गेल्या त्यातील काही अत्यंत हीन स्वरूपाच्या आणि लाजवणार्या होत्या.( काही अपवाद वगळता त्या धादांत खोट्या होत्या) 
नंतर शिवाजी राजांनी त्यांना परत स्वराज्यात आणले तो भाग वेगळा पण तोवर खूप उशीर झाला होता संशयाचे धुके गडद होत चालले होते आणि मराठी साम्राज्यावरचा शिवाजी नामक सूर्य अस्ताकडे चालू लागला होता.
नंतर शिवाजी राजांनी त्यांना परत स्वराज्यात आणले तो भाग वेगळा पण तोवर खूप उशीर झाला होता संशयाचे धुके गडद होत चालले होते आणि मराठी साम्राज्यावरचा शिवाजी नामक सूर्य अस्ताकडे चालू लागला होता.
शिवाजी राजाननंतर जरी शंभू छत्रपती झाले तरीही त्यांना ना जनतेने मनापासून साथ दिली ना त्यांच्या सरदारांनी आणि नाही घरून साथ मिळाली. हा माणूस एकहाती मराठेशाही राखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता.पण त्यात त्यांना सपशेल अपयश आले कारण मराठी समाजाला लागलेली फंद फितुरीची आणि बेकीची कीड यांनी त्यांचा घात केला आणि एक अजोड योद्ध, एक कुशल राजकारन्याला धर्मासाठी हालाचे मरण पत्करावे लागले. 
सध्या सुद्धा त्यांच्या नावाने समाजात जातीय तेढ वाढवण्याचाच प्रकार एक तथाकतीत संघटना करीत आहे. म्हणजेच अजूनही ह्या शंभूचे भोग पुरे झालेले नाहीत असेच म्हणावेसे वाटत आहे. 
No comments:
Post a Comment