Wednesday, 25 May 2016

मनोगत

                सध्या बराच उकाडा आहे सगळीकडे त्यामुळे सगळीकडे कुलर/ACएसी नाहीतर निदान फॅन ची तरी प्रचंड मागणी आहे. थोडा वेळ जरी वीज गेली तरी आपला जीव कासावीस होतो.

               परवा रात्री दिवसभर दमून मस्त झोप लागली होती पण नेमकी पहाटे २/२.३० ला वीज गेली आणि घामाच्या धारांनी जीव पार कासावीस झाला कुठे पेपर ने वारे घे कुठे पाणीच मार चेहऱ्यावर असे उद्योग चालू होते. अचानक पेपरने वारे घेता घेता मन भूतकाळात गेले
              तेव्हा मी साधारण ७/८ वीत असेल आम्ही कर्वेनगरला चाळीत राहायला होतो. काही कारणास्तव चाळीचे वीजेचे कनेक्शन तोडले होते आमच्या. साधारण २ वर्ष पूर्ण वीज नाही आणि १ वर्ष फ़क़्त रात्रीची वीज अशी परिस्थिती होती त्यात डोक्यावर पत्र्याचे छत. पण आत्ता १ तास वीज गेल्यावर जसा जीव कासावीस झाला होता तसा त्या ३ वर्षात कधीही झालेला आठवत नाही काय बरे कारण असेल ?

             खूप विचार केला तेव्हा समजले परिस्थिती येस तीच आपल्याला बळ देत असते अशा दिवसात. आणि उलट तेच दिवस माझ्या आयुष्यात मी जास्ती आनंदाने घालवले असतील असे मला आज वाटते कारण रोज रात्री कँडल लाईट डिनर चे भाग्य फार थोड्या माणसांना लाभते आयुष्यात, चाळीतील मुला-मुलींना रात्री ओट्यावर जमा करून कंदिलाच्या प्रकाशात त्यांना भुताच्या गोष्टी सांगण्याची सवय पण त्याच २/३ वर्षातली.

            घरात वीज नाही त्यामुळे शनिवारी सकाळी शाळेतून मिळेल ती बस पकडून धावत पळत घरी येऊन शक्तिमान बघायला जवळच्या मामाकडे जायचे हे पण एक ठरलेले असायचे खर तर आत्ता या गोष्टीचे हसायला येते पण तेव्हाची ती धडपड खूप मनापासून केलेली असायची साला.

           याच अंधारलेल्या दिवसांनी खरे आपले कोण आहे हे सुद्धा नकळत समजत गेले त्या वयात. आधी उन्हाळ्यात आवर्जून येणारी नातेवाईक मंडळी त्या २/३ वर्षात चक्क गायाबली होती १/२ जणांनी तर तोंडावर सांगितले होते कि तुमच्याकडे वीज नाही आणि टीवी व फॅनशिवाय आम्हाला काही जमत नाही. असो असतो एकेकाचा स्वभाव.

       मात्र कर्वेनगरच्या चाळीत काढलेले ते अतीव आनंदाचे आणि बेफिकिरीचे दिवस आठवून आजही मन हळहळायला लागते.

       वरच्या सगळ्या मनोगतातील तात्पर्य काय तर माणसाने नेहमी परिस्थितीशी हातमिळवणी केली पाहिजे बास...

जाता जाता ...
         हल्ली वीज गेली कि माझा ७ वर्षाचा मुलगा बाबा घरात आता इनव्हटेर घ्या म्हणून मागे लागतो काळाचा महिमा बाकी काही नाही ....

तळटीप :- माझ्या छोट्या आयुष्यातील थोड्याफार संघर्षाची वाटचाल मांडायची इच्छा आहे इथे बघू कसे जमतेय ते...

आपला उपेक्षित...

No comments:

Post a Comment