भास...आभास.... कि अमानवीय !!!
भाग - १
खरे तर हा विषय थोडा ट्रिकी आहे कारण या विषयाव तीन गट पडतात एक जो अशा गोष्टींवर विश्वास आहे असा दुसरा ज्यांचा अशा गोष्टींवर विश्वास नाही ते आणि तिसरा गट तळ्यात मळ्यात असतो या लोकांना काळातच नसते कि नक्की आपण कुठे उभे आहोत असे.
हा विषय इथे मांडायचे कारण हेच आहे कि गेले काही दिवस माझा या गोष्टींवरच विश्वास दृढ होईल अशा काही घटना माझ्या आयुष्यात घडत आहेत. सर्वात आधी हे स्पष्ट करू इच्छितो कि सध्यातरी माझा सुष्ट-दुष्ट अथवा प्लस-मायनस उर्जा या जगात असते या गोष्टीवर विश्वास आहे. जसे कि जगात जिथे प्लस उर्जा आहे तिथे मायनस उर्जेला नाकारायचे काही करणाच नाहीये (असे आपले मला वाटते) कारण जगात बरयाच गोष्टी अशा आहेत कि ज्यांची उत्तरे ना विज्ञान देऊ शकले आहे आजवर ना हि कुणी त्याचे सुसंगत असे स्पष्टीकरण देऊ शकले आहे.
जगात सुष्ट आणि दुष्ट यामध्ये पूर्वीपासून संघर्ष चालू आहे, मला असे वाटते कि या दोहोंमधील जी रेषा आहे ती काहीशी पुसट आहे म्हणजे असे कि बऱ्याचदा असे होते कि काही विचित्र अशा संवेदना आपल्याला जाणवतात पण काही वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष्य करतो अथवा आपण त्याला भास समजतो काही जण तर असे असतात कि इतर लोक काय म्हणतील अथवा आपले हसे होईल म्हणून अशा गोष्टी इतरांना सांगायचे टाळतात. त्याउलट रात्री बर्याचदा काळोखामुळे सावल्यांच्या खेळाला आपण वेगळेच अमानवीय असे काहीतरी समजून बसतो.
आत्म्याचा प्रवास कुणालाच उलगडून सांगता आला नाहीये, माणसाचे मृत्युनंतरचे जीवन अथवा आपण असे म्हणू कि त्याचे मृत्युनंतर नक्की काय होते हेही कुणाला सांगता आलेले नाहीये, मग बरेच जण आपल्या कल्पनेचे वारू सैल सोडतात आणि बऱ्याचदा अशा गंभीर विषयाचा विचका होतो.
मी अशा काही ठिकाणी फिरलेलो आहे कि जिथे टळटळीत दुपारीसुद्धा हात पाय थंड पडतात. अशा ठिकाणी तुम्ही रात्रीचे जावा नाहीतर दुपारचे काही फरक नाही पडत पण पूर्वापारपासून आपण अंधाराचा आणि अमानवीय गोष्टींचा ओढून ताणून संबंध लावायला पाहत असतो कारण सरळ आहे अंधारात कुणी काय पाहिले हे कोणी विचारायला जात नाही मग त्याची शहानिशा करणे तर दूरची बात.
आजही काही जागा अशा आहेत कि जिथे गेले कि माणसाला अस्वस्थ वाटायला लागते, कधी एकदा इथून बाहेर पडतोय असे होते, नाहीतर कुणीतरी आपल्यावर सतत नजर ठेवून आहे असाही फील येतो अशा ठिकाणी.
खरे तर तुम्ही सगळे विचार करत असाल कि हा काय डोक्यावर पडला आहे का नक्की काय म्हणायचे आहे याला ? खरे तर मला जे म्हणायचे आहे ते म्हटले तर साधे सरळ आहे आणि म्हटले तर थोडे विचित्र कारण मला माझ्या आयुष्यात घडलेल्या अशाच विचित्र गोष्टींचा संदर्भ द्यायचा आहे इथे आणि ती गोष्ट तुम्हाला खरी वाटावी, पटावी म्हणून हे सारे अवांतर लिहिले गेले आहे.
बाकी तुमचे काय मत आहे ते हि जाणून घ्यायला आवडेल मला कारण जसजशी माझी गोष्ट पुढे जाईल तसतसे तुम्हाला आणि मला सुद्धा काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.
माझे म्हणणे इतकेच आहे कि मी जसा माझा सत्यानुभव तुम्हाला सांगणार आहे त्याच प्रकारे तुमच्याकडून पण मला ते ऐकायचे आहेत, मात्र अट एकच आहे माझी हे अनुभव प्रामाणिक असावेत, त्यात अतिरंजितपणा नसावा हीच नम्र विनंती आहे, तसेच कुण्या लांबच्या मित्राचे अनुभव इथे देऊ नका, तुम्हाला स्वतः ला आलेले अथवा जवळच्या व्यक्तीला आलेले अनुभव टाकले तर जास्ती चांगले.
असो यावरच्या पुढील भागात माझे काही अनुभव मी तुमच्याशी शेयर करणार आहे ते अनुभव म्हणजे एका विचित्र घटनांची साखळी आहे जिच्या काही कड्या कुठे जोडल्या आहेत ते ना मला माहित आहे ना बाकी कुणाला, तसेच या सर्व घटना मती गुंग करून सोडणाऱ्या आहेत. सरधोपट गूढ कथांसारखा याचा शेवट नाहीये रादर या घटनांना शेवटच नाहीये सध्यातरी कारण अजून याचा शेवट बाकी आहे याचे स्पष्ट संकेत मला मिळत आहेत. त्या कड्या शोधायचा माझा प्रयत्न मात्र मी सोडणार नाही आणि त्या जुळणाऱ्या कड्या तुमच्यासमोर ठेवायचे काम सुद्धा मी सोडणार नाही.
माणसाच्या जाणीवा आणि नेणीवा खूप विचित्र असतात अस नाही वाटत तुम्हाला कधी ? म्हणजे अस बघा कि माणसाला एखाद्या गोष्टीची जाणीव झाली पण ती त्याने कुणाजवळ व्यक्तच नाही केली तर.. तर काय होईल?
खरे तर त्यादिवशी मला सुद्धा असच वाटत होत.....
------------------------------ ------------------------------ ---
त्यादिवशी मस्त सुट्टीचा मूड होता आमचा आणि कोकणात सुट्टी म्हणजे मग काही विचारायलाच नको त्यात थोडा दूरचा पण अत्यंत शांत आणि स्वच्छ असा केळशीचा किनारा म्हणजे तर काय आमच्या सारख्या माणूसघाण्या (पुणेकर) लोकांसाठी नंदनवनच जणू.
शनिवारी सकाळी लवकर नाष्टा उरकून आम्ही ताम्हिणीमार्गे केळशीकडे निघालो होतो खूप दिवसांनी असा मोकळा वेळ मिळत होता मला आणि शलाकाला त्यामुळे सकाळी निघाल्यापासून शलाका मला अक्षरशः चिकटून होती आणि तिला खुश पाहून मी तर ‘सांतवे आसमान पे था’. वाटेत कुठेही जास्ती वेळ ण घालवता आम्ही दुपारी २ वाजता केळशीला येऊन पोहोचलो होतो. केळशीला आम्ही राहण्यासाठी वर्तकांचे घर बुक केले होते कारण ते अगदी समुद्रकिनारी तर होतेच पण शिवाय गावापासून थोडे दूर देखील होते त्यामुळे आम्हाला पूर्ण प्रायव्हसी देखील मिळणार होती आणि जी कि आम्हाला खूप मोलाची होती.
दुपारी वर्तकांच्या घर-कम-कॉटेज वर पोहोचल्यानंतर सर्वात आधी तिथल्या केअरटेकर काका ज्यांना सगळे तात्या म्हणून बोलवत त्यांना सांगून कोकणी जेवणावर यथेच्च ताव मारला, गेल्यापासून राहून राहून एक गोष्ट जरा खटकत होती ती म्हणजे तात्या थोडे नाराज दिसत होते म्हणजे त्यांच्या पाहुणचारात काही कसर नव्हती जेवण सुद्धा उत्कृष्ट होते पण तात्या जास्ती काही बोलतही नव्हते आणि सतत दडपण असल्यासारखे दिसत होते, पहिलाच दिवस म्हणून आम्ही काही जास्ती लक्ष दिले नाही पण जेव्हा तात्यांनी आम्हाला परत कधी जाणार, किती दिवस राहणार असे विचारले तेव्हा मी त्यांना थोड्या रागातच समाज दिली कि ते आमचे आम्ही बघू म्हणून तात्या थोडे वरमले आणि आपल्या कामाला निघून गेले.
कोकणच्या बाबत मी नेहमी एक गोष्ट नोट केली आहे कोकण दिवसभर अगदी द्रिष्ट लागण्यासारखे दिसते पण जसजसा अंधार पसरू लागतो तसतसे थोडे भकास आणि गूढ वाटायला लागते हा गूढपणा कधीतरी छान वाटतो पण नेहमी नेहमी नको रे बाबा अस होऊन जात.
तात्यांचे घर आमच्या कॉटेज पासून साधारण २ किलोमीटर्स होते त्यामुळे संध्याकाळी तात्या आणि त्यांची पत्नी जेव्हा आम्हाला रात्रीच्या जेवणासाठी काय करू म्हणून घाई करू लागले तेव्हा मात्र मी त्यांना बजावले आणि मालकांना तक्रार करायची धमकी सुद्धा दिली त्यामुळे दोघे गप्प बसले असले तरीही आतून खूपच अस्वस्थ वाटत होते.
पहिल्याच दिवशी घराचा शांतपणा जरासा अंगावर येऊ लागला होता त्यामुळे माझा आणि शलाकाचा नाही म्हंटले तरीही थोडा मूड ऑफ झाला होता म्हणून मग आम्ही बाहेर पडवीत असलेल्या भल्यामोठ्या झोपल्यावर उगाच आपले पत्ते खेळ कुठे मोबाईलवर गेम खेळ असले उद्योग करत बसलो होतो पण नाही म्हंटले तरीही त्या गूढ आणि शांत वातावरणाचा आमच्यावर एकप्रकारे अंमल चढत होता.
संध्याकाळी लवकर म्हणजे जवळ जवळ ६ वाजता तात्या आणि त्यांच्या पत्नी राधा सर्व स्वयंपाक आटोपून घाईने आमचा निरोप घेऊन गेले सुद्धा, इतकावेळ त्यांच्यामुळे आम्ही दोघेही जरा निवांत होतो पण ते दोघे गेल्यावर मात्र आमची थोडी टरकली पण मनावर आलेले भीतीचे सावट घालवावे तर लागणार होते आणि त्यामुळे आम्ही बीचवर भटकाय जे बाहेर पडलो ते साधारण ९ वाजता परतलो फिरण्याने भूकही लागली होती त्यामुळे फ्रेश होऊन लगेच जेवण करायला गेलो शलाकाला चेंज म्हणून तिला आज मी सर्व करणार होतो त्यामुळे सर्व करायला भांड्याचे झाकण उघडले आणि अक्षरशः धक्का बसला मला...
---------------------------
आपला
No comments:
Post a Comment